मारवड महाविद्यालयात डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी

रयतसंदेश न्युज नेटवर्क :—

 

अमळनेर ( प्रतिनिधी) –
ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतिश पारधी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी कु. हर्षदा पाटील हिने शिक्षक दिनानिमित्त एका कवितेतून शिक्षकाविषयी विचार मांडले.
” कळतच नाही सर मला काही
लिहावे तुमच्या वरती
कार्यही तुमचे तेवढेच नी
तेवढीच आहे तुमची किर्ती
तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले
आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून
थोडा मी हि प्रयत्न केले सर
त्यात माझही नाव यावं म्हणून
सर तुम्ही बोललेले शब्द कटयारी
सारखे वार करत होते
पण जीवनाच्या रणांगणात
लढण्याचे सामर्थ्य देत होते
सर तुमच्या वरती खूप लिहायचे होते
माझ्या आयुष्याच्या डायरीत
पण अक्षरच सापडेना सर
तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत
शिक्षकांविषयीचे मत हर्षदा हिने एका कवितेतून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा. विजय पाटील, श्रीमती मंजुषा गरूड, श्री. सचिन पाटील, श्री. सचिन साळुंखे, श्री. दिपक पाटील विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page