अमळनेर ( प्रतिनीधी) निम्न तापी प्रकल्पाचे , पाडळसे धरणाचे काम गेल्या 26 वर्षापासून सुरू आहे 142 कोटी किंमत असलेले पाडळसे धरण आज 5000 कोटी किंमतीचे झाले आहे . हा सर्व जनतेचा पैसा आहे. धरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, दरवर्षी पाचशे कोटी रुपये पाडळसे धरणासाठी आर्थिक तरतूद केली तरच धरण दहा-पंधरा वर्षात पूर्ण होऊ शकते एवढा निधी महाराष्ट्र राज्याचा जलसंपदा विभाग देऊ शकत नाही त्यामुळे राज्याच्या निधीतून धरण होणे कठीण व अशक्य आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान जलसिंचन योजनेत पाडळसे धरणाचा समावेश अजून झालेला नाही परंतु त्या दृष्टीने भेटीगाठी सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडे पडून आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय पाडळसे धरण होऊच शकत नाही .त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पाडळसे धरणाचे गाजर दाखवून मतदारांना वेडे बनवू नका. नाहीतर मतदार तुम्हाला घेर ल्याशिवाय राहणार नाही. असे परखड मत पाडळसे धरण पुस्तिकेचे लेखक व सामाजिक ,राजकीय जेष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केले. ते नागरिक हित दक्षता समितीच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर(प्रतिनिधी )- नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असताना त्यांना मदतीसाठी व त्यांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यासाठी…