बहीण खरंच लाडकी असेल तर लाडक्या जीएसटीला आवरा. — प्रा. अशोक पवार

रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर ( प्रतिनिधी)– केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. तो कर सर्वसामान्य गरीब, कष्टकरी भरतात .बहीण खरंच लाडकी असेल तर लाडक्या जीएसटीला आवरा ही सांगण्याची वेळ आली आहे. छत्री 12% गॅस शेगडीवर 18% मुलांना आईस्क्रीम खाऊ घातले तर 18% मुलांच्या वाढदिवसाचे केक खरेदी केला तर 18% कृषी अवजारे 12% ट्रॅक्टर टायर पार्ट 18% प्रोसे सिंग मिलिंग मशीन 18% कीटकनाशके १८ टक्के तसेच घरगुती स्वयंपाक गृहात लागणाऱ्या वस्तूंवरील व खाद्यपदार्थांवरील कर केंद्र सरकारने कमी केला नाही, त्यामुळे मासिक घर खर्च वाढला आहे.

महागाईचा राक्षस गरिबांना उध्वस्त करीत आहे. उत्पन्न कमी खर्च जास्त तर जनतेने जगायचे कसे? गरीब ,महिला, शेतकरी, व मुलांसाठीच्या वस्तूंवर अप्रत्यक्ष कर कमी न केल्याने ,दैनंदिन मासिक खर्चासाठी कर्ज काढावे लागते. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 7545 कोटी त्यात फक्त विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांवर सहाशे कोटींची तरतूद केल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांना आर्थिक तरतूद नसल्याने पाडळसे धरणाला एक पैसाही मिळणार नाही. मतदारांनो हाल अपेक्षा सहन करा, मरा, पण मला “मोठ माय” म्हणा .अशा शब्दात प्रा. अशोक पवार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले .सामाजिक कार्यकर्ते रियाज मौला यांनी अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा व व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी शहरातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page