अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँके च्या वेबसाईटचे उदघाटन व सभासद पाल्यांचा गौरव समारंभ संपन्न

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर(प्रतिनिधी ) :- अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँके च्या वेबसाईटचे उदघाटन व सभासद पाल्यांचा भव्य गौरव समारंभ बँकेच्या सर्वसाधारण सभेत हजारो सभासदांच्या उपस्थितीत इंदिरा भवन येथे संपन्न झाला. शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्याच्या दृष्टीने सभासदांनी केलेल्या मागण्या संचालक मंडळासह सभेने मंजूर केले.
दि.अमळनेर को. ऑपरेटिव्ह अर्बन बँक शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करतांना बँक सभासदाभिमुख व्हावी या उद्देशाने सदर सभेत बँकेची वेबसाईटचे भव्य स्क्रीनवर चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी संचालक मोहन सातपुते, प्रदिप अग्रवाल, पंडित चौधरी,भरत ललवाणी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील,दिपक साळी,लक्ष्मण महाजन,सौ.वसुंधरा लांडगे,प्रविण जैन, डॉ. मनिषा लाठी, ऍड.व्ही आर पाटील, विजय बोरसे , बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी बँकेच्या सभासदांच्या मोठ्या संख्येने उपस्थित गुणवंत पाल्यांचा गौरव भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला.
सदर सभेत सभासद विक्रांत पाटील , सोमचंद संदांनशिव, प्रा डॉ लिलाधर पाटील,शशिकांत पाटील यांनी विविध सूचना मांडत संजय शुक्ल,दिलीप ठाकूर,गुलाब महाजन, भिका पाटील,पी वाय पाटील यांचेसह अनेक सभासदांनी बँकेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध मागण्याचे शेकडो सभासदांच्या सह्यांचे निवेदन दिले. यावेळी संचालक मंडळाच्यावतीने बोलतांना व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी शतक महोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबवायचे दृष्टीने सभासदांनी केलेल्या मागण्या संचालक मंडळाने स्विकारून सदर सभा मंजूर करीत असल्याचे जाहिर केले.सभेचे प्रास्ताविक चेअरमन पंकज मुंदडे यांनी केले.बँकेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा संचालक विजय बोरसे यांनी मांडला.सभेचे व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले. सभासमारंभाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी वृंद पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी उपस्थित सभासदांमध्ये माजी संचालिका मिराबाई निकम, रामदास शेलकर, अड.सुरेश सोनवणे, प्रसाद शर्मा,हिम्मत पाटील,शिवाजी खैरनार,जयंतीभाई कोचर, जे डी पाटील, ईश्वर पाटील,पुरुषोत्तम शेटे,अतुल चौधरी,विजय वाणी, प्रभाकर महाजन,डी ए धनगर, दिपक गांधी, लुल्ला,आदिंसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page