अमळनेर( प्रतिनिधी)- शहर,व अमळनेर तालुक्यातील तरुणांनी आणि युवकांनी जे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत जे काही नेत्यांवरती विश्वास ठेवून आपला आयुष्य, आपले करिअर पणाला लावतात त्यांना मी माझ्या व्यक्तिगत जीवनात राजकीय आयुष्यात मला आलेल्या अनुभवावरून माझं झालेल्या नुकसानावरून मी त्यांना तो सल्ला देतोय आपण सगळ्यांनी ऐकलं असेल परवा मा. आ. चौधरी यांनी माझ्यासह मंत्री अनिल पाटील आणि मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्यासह 29 लोकांवरती जो गुन्हा दाखल केलेला होता. 2016 च्या नगरपरिषद निवडणुकीच्या वेळेला दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांनी परवा कोर्टात आपली साक्ष दिली याच्यावर त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही साक्ष फिरून सहकार्य करा. अशी विनंती नेमकी तुम्हाला कोणी केली होती ? आमच्यापैकी काही आरोपी तुमच्याकडे आले होते का ? आणि जर आम्ही आलो नसलो तर मग तुमची मंत्री अनिल पाटील आणि मा.आ. साहेबराव पाटील यांच्याशी काही चर्चा झाली आणि तुमच्याकडे सेटलमेंट होऊन तुम्ही गुन्हा मागे घेण्याचा किंवा याच्यात साक्ष फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे का ? कारण तुम्ही साक्ष फिरवली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री महोदयांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि त्या बैठकीत त्यांनी जाहीर केलं की आज आपल्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या दहा उमेदवारां पैकी नऊ उमेदवार येणाऱ्या काळात आपल्या सोबतच आहेत. याचा अर्थ काय ? याचा संदर्भ काय ? म्हणजे एकीकडे त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्यावरती मा.आ. चौधरी हे साक्ष फिरवुन त्यांना सहकार्य करतात त्यांना त्या गुन्ह्यातून निर्दोष सुटण्यासाठी मदत करतात आणि दुसऱ्या दिवशी मंत्री अनिल पाटील म्हणतात की दहा पैकी नऊ उमेदवार आपल्या बाजूने राहतात हे कुठेतरी संशय येण्यासारखे आहे.जर सहकार्य करायचं होतं तर 2014 मध्ये मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील, मा.आ.चौकशी आणि मंत्री अनिल पाटील हे तिन्ही उमेदवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी असताना विधानसभेच्या निवडणुकीत मा.आ.शिरीष चौधरी गटाचे चार लोकं आणि मा.आ.कृषीभुषण साहेबराव पाटलांच्या गटाचे चार लोक आणि माझ्यासह यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही नऊ वर्ष लढा दिला त्या नऊ वर्षात आम्ही अनेक वेळा कोर्टात गेलो आणि त्या संपूर्ण लढ्याचा खर्च आम्ही वैयक्तिक केला त्याच्यातून आम्ही वैयक्तिक रित्या मार्ग काढून निर्दोष सुचलो यात तुम्हाला पुढाकार घ्यावा अस कधी वाटलं नाही.याच्यातून तुम्ही नेते सगळे एकत्र आहात आणि तुम्ही या अंमळनेर तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक कार्यकर्ते, आणि सर्व मतदारांच्या भावनांशी खेळता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाहीत तुम्ही बहुचर्चीत पाडळसरे धरणाच्या मुद्द्यावरती एकत्र येऊ शकत नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्रित येत नाही पण तुम्ही या कोर्टाच्या तारखेला एकत्रित आलेत याचं गोड बंगाल काय ? तुम्ही धरणांवरती एकत्र आले असते तर आम्ही तुमचे ढोल ताशे लावून स्वागत केले असते.तुम्ही या गुन्हयातून यांना निर्दोष सोडण्यासाठी एकत्र येतात म्हणून आमच्या मनात शंका आहे. याचा जाब कोणी विचारो वा ना विचारो मी विचारेल कारण याचा अधिकार मला आहे.
अंमळनेर तालुक्याचे आजपर्यंतच्या राजकारणात सगळ्यात मोठा गुन्हेगार व्यक्ती मी झालेलो आहे कारण 2016 मध्ये अमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत जेवढे नगरसेवक उमेदवार होते जेवढे राजकीय कार्यकर्ते नेते आणि सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्यात सगळ्यात जास्त गुन्हे माझ्यावरती झालेले आहेत त्या कार्यकाळामध्ये तीन गुन्हे दाखल झाले ते त्यापैकी एक गुन्हा असा दाखल झाला होता की त्याच्यात माझी कौटुंबिक आणि आर्थिक किती हानी झाली. मला साडेचार महिने बाहेर राहावं लागलं, दोन महिने नाशिक कारागृहात राहावे लागले त्यावेळेला कोणी पुढाकार का घेतला नाही आणि त्यावेळेला कोणी सामंजस्य दाखवले नाही आणि मंत्री अनिल पाटील आणि मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे गुन्हयातुननाव काढण्यासाठी मा.आ.शिरीष चौधरी सुद्धा सामंजस्य दाखवतात आणि मंत्री अनिल पाटील सुद्धा कोर्टात उपस्थितीतराहून सामंजस्य दाखवतातं तर हे आमच्या मनाला न पडणारे आहे.त्या कार्यकाळामध्ये तीन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या तीन गुणांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये माझे दोन्ही भाऊ आहेत. परवा जो गुन्हा मागे घेतला त्याच्यात माझे मोठे बंधू प्रशांत पाटील आणि मी होतो आणि त्याच दिवशी वरच्या सेशन कोर्टामध्ये परत माझा दुसर्या एका गुन्हयात मला तिथे तारखेला हजर राहायचं होतं त्या गुन्ह्यामध्ये मी आणि माझे लहान बंधू आहे. म्हणजे अमळनेर शहरातल्या तालुक्यातल्या राजकारणातला मी एकमेव असा राजकीय कार्यकर्ता आहे. म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि म्हणून मी सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय, मी श्याम पाटील किंवा माझा मित्र परिवार तुमच्यासारखे प्रेम करणारे मित्रमंडळी माझ्यासोबत होते म्हणून मी या सगळ्या अडचणीतून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने सुखरूप निघालो परंतु अशी परिस्थिती भविष्यात कुठल्याही राजकीय सामाजिक कार्यकर्त्यावरती येऊ नये . तुम्हाला ही निवडणूक सुरत आणि इंदोर मध्ये जे झालं त्या दिशेने तर न्यायची नाही नां आणि त्या दिशेने नेऊन तुम्ही अंमळनेर तालुका वाटून घेणार आहेत का ? तुम्ही नगरपरिषद घेऊन टाकायचे, एकाने विधान परिषद घेऊन टाकायची,दुसऱ्या ने विधानसभा घेऊन टाकायचं अशा तुमच्या जागा वाटून घेणार आहेत का? यांना कोणी जाब विचारेल किंवा नाहीये मला माहित नाही पण मी जाब विचारणार आणि येणाऱ्या काळात यांचे सगळे चेहरे उघडे पाडू येणाऱ्या काळात यांना सत्तेवरून पाय उतार केल्याशिवाय मी थांबणार नाही.