भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर(प्रतिनिधी )- भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अहर्ता दिनांक 01.07.2024 अंतर्गत
*नव मतदारांची नाव नोंदणी*
*मयत मतदारांची वगळणी*
*तसेच नावात दुरुस्ती करणे*
इत्यादी बाबींसाठी नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील *मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बीएलओ* यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
*यासांठी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी मतदान नोंदणी अधिकारी बूथ वर उपस्थित राहतील*

तरी शहरातील नागरिक यांनी सदर शिबिरात वरील प्रमाणे नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, नावात दुरुस्ती या बाबी असल्यास शिबिरात जाऊन शिबिराचा लाभ घ्यावा व *राजकीय पदाधिकारी* यांनी नागरिकांना उद्युक्त करून शिबिरात घेऊन जावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी श्री महादेव खेडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page