मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबीरास उदंड प्रतिसाद.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर(प्रतिनिधी  ) :-

येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व गोदावरी फाउंडेशन , जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात २४ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात व्हॉईस ऑफ मीडियाचे पत्रकार व त्यांचे कुटुंबीय, मंगळ ग्रह सेवा संथेचे कर्मचारी व सेवेकरी व त्यांचे कुटुंबीय तसेच सर्व वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरात २डी इको, इसीजी, कार्डीओग्राफ, रक्तदाब आदी तपासण्या करुन औषधोपचारही करण्यात आला.
तत्पूर्वी शिबिराचे उद्घाटन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, गोदावरी फाउंडेशने डॉ. दिनेश चौधरी, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. शुभम कॉलरा, डॉ. सुमित भोसले, डॉ. तेजस सोनवणे, डॉ. कुशल धांडे, डॉ. अभिलाश मोवाळे, डॉ. जान्हवी मापारी, डॉ. अजय राख, डॉ. तुषार चले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले. यावेळी डॉ. डिगंबर महाले यांनी आरोग्य शिबिराचे महत्व विशद केले. व्यासपीठावर उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डि. ए. सोनवणे, जयश्री साबे, उज्ज्वला शहा, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संयज सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष उमेश काटे आदी उपस्थित होते.
या शिबिरात जिल्हा मेडिकल असोशियशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव प्रविण माळी, खजिनदार रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष निलेश पाटील, जेष्ठ सभासद नरेंद्र पाटील यांनी मोफत औषधे उपलब्ध करुन दिले.
शिबीर यशस्वीतेसाठी मंगल सेवेकरी तसेच गोदावरी फाउंडेशनचे मोहम्मद हुसेन, रुतूजा अवाघडे, श्रावण कऱ्हार, रितेश पोटोळे, रितू भिलावेकर, प्रिती वसावे, प्रतीक्षा दाते आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page