“सानेगुरुजी स्मृती दिनानिमित्त आयोजिलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण”. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण”.

“सानेगुरुजी स्मृती दिनानिमित्त आयोजिलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण”.
अमळनेर ता.प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.

अमळनेर : सानेगुरुजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जून महिन्यात आयोजिलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरणाचा कार्यक्रम जी. एस. हायस्कूलच्या सभागृहात काल संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा.शी.मंडळाचे संचालक,जी. एस. हायस्कूलचे चेअरमन हरी भिका वाणी होते. सोबत व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक प्रा. लिलाधर पाटील व रामेश्वर भदाणे होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना म्हटली. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविकातून सहा महिन्यांत झालेल्या कार्यक्रमांचा लेखाजोखा मांडला. यानंतर जी. एस. हायस्कूलचे नवनियुक्त मुख्या. बी. एस. पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सानेगुरुजी स्मृती दिनानिमित्त आयोजिलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना बी. एस. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचं संरक्षण कसं करावं ? उत्तम शिक्षण कसं द्यावं ? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा ? याचे धडे मी ज्यांचेकडून अनुभवले त्या गुरुचा मी शिष्य आहे. माझ्या गुरुकडून होणारा हा सत्कार मोलाचा आहे. त्यांनी युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे चालविलेल्या राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानामुळे काही प्रमाणात का होईना वाचनसंस्कृती वाढते आहे. समाज सुधारकांचे कार्य, विचार जनतेत पोहोचविले जात आहेत. ही शिदोरी अब्दुल कलाम यांना हवे असलेले नव्या भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहे. असा आशावाद व्यक्त केला. सत्काराचा असा तिहेरी योग..
ज्या शाळेत मुख्याध्यापक त्या शाळेचे चेअरमन हरी वाणी, माझे गुरु अशोक पवार सर व मी शिष्य असे तीनही जण एकाच व्यासपीठावर शाळेतच सन्मान केला जाणं हा तिहेरी योग.
रामेश्वर भदाणे म्हणाले की, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहभागी सर्वच स्पर्धक बक्षिसास पात्र होते. मात्र परीक्षक नात्याने वक्तृत्व करतांना राहिलेल्या उणीवा मुळे मार्कस कमी जास्त देऊन निकाल दिला असल्याचे स्पष्ट केले.
प्रा डॉ लिलाधर पाटील म्हणाले की, नुसतेच वाचन नको तर कृतीयुक्त संस्कार करण्याचा प्रयत्न हवा तरच जागतिक संस्कृतीचा विकास होत असतो. बहुश्रुत व्यक्तीमत्व असावं हे सांगताना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा दाखला दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, श्रीकांत चिखलोदकर, यमुनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय सूर्यवंशी, साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डी. एम. पाटील, दयाराम पाटील, उमेश मनोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी तर आभारप्रदर्शन बापूराव ठाकरे यांनी केले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालकवर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

You cannot copy content of this page