श्रीमती सुषमा इंगळे, जि.प.शिक्षिका यांनी विद्यार्थी ला दिली वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखी भेट

दिनांक 29/12/2023 रोजी समावेशित शिक्षण विभाग जळगाव जिल्हा समन्वयक श्रीमती.सुषमा इंगळे मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळा खोकरपाठ येथील दिव्यांग विद्यार्थी शैलेश अरुण भिल इयत्ता 1 ली बहुविकलांग विद्यार्थी या दिव्यांग विद्यार्थ्यास त्यांच्या मुलाचे वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या स्वखर्चाने व्हील चेअर घेऊन आपल्या हस्ते भेट दिली. आणि विद्यार्थ्याची शाळेत येण्या-जाण्याची सोय करून दिली.त्याबद्दल गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री रावसाहेब पाटील यांनी जिल्हा समन्वयक श्रीमती. सुषमा इंगळे मॅडम यांचा सत्कार केला. सोबत विशेष शिक्षक शितल भदाणे, रेखा वारडे, सोनाली पिंगळे, सुनिता पाटील,किशोर पाटील, मोहन मराठे, हंसराज पाटील, अमोल पाटील विषय तज्ञ तुषार पाटील, फापोरे केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र गवते सर आदि उपस्थित होते.*

You cannot copy content of this page