रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे येथील आदिवासी विकास संघटनेचे माध्यमातून व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक सागर कोळी यांचा वाढदिवस केक कापून व मेणबत्या विझवून साजरा न करता ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटून विद्यार्थीना मदतीचा हात देत पाडळसरे जिल्हा परिषद शाळेत साजरा केला.
राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून घडलेल्या संस्कारातून परोपकाराचे गुण अंगीकारून सागर कोळी या नवं तरुणाने समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो फुल नाही फुलाचे पाकळी म्हणून गोरगरीब विद्यार्थ्यांना ”शैक्षणिक साहित्य वाटप करूयात व मुलांचे भविष्य घडवूया” म्हणून वह्या व शैक्षणिक साहित्य शिक्षक व गावातील नागरिकांच्या हस्ते वाटप करून सागर कोळीचा अनोखा वाढदिवस साजरा केला, पाडळसरे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक व ग्रामस्थांनी वाढदिवसाच्या व भविष्यातील पुढील वाटचालीसाठी देखील सागर ला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिक भिला दादा, रणछोड आप्पा, पत्रकार वसंतराव पाटील,गोपाल कोळी,भुषण पाटील,सचिन पाटील,भागवत पाटील,गुणवंत सोनवणे,जगदीश कोळी,महारु कोळी व शाळेतील मुख्याध्यापक दिपक भामरे व उपशिक्षिका अल्का फुलपगारे उपस्थित होते…