अमळनेर प्रतिनिधी – रयत संदेश न्यूज
कु. डॉ. वेदांती देशमुख हिने पीजी नीट परीक्षेत उज्वल यश मिळवित एम एस (गायनॅक) ला घेतला प्रवेश साने गुरूजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री एस डी देशमुख यांची सुकन्या कु डॉ. वेदांती सतिष देशमुख हिने आपल्या कठोर मेहनत , जिद्द , चिकाटी , सातत्याने परिवाराचे मार्गदर्शन व सहकार्य , आजी – आजोबा , गुरुजन / वडिलधाऱ्यांचा आशिर्वादाने पी जी च्या नीट परीक्षेत उत्तुंग यश मिळवित एस एम बी टी वैदयकिय महाविद्यालय नाशिक येथे MS (Gynac ) साठी प्रवेश मिळविला. तिचे प्राथमिक शिक्षण साने गुरुजी विद्यामंदीर , माध्यमिक शिक्षण साने गुरूजी कन्या हायस्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण प्रताप कॉलेज मध्ये झाले. वेदांती १२ वी ला देखील physics विषयात नाशिक बोर्डात प्रथम आलेली होती. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे .




