अमळनेर रयत संदेश न्यूज :
अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाचा रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती उपक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्वमेघ पाटील, दिपक शेलार, जयेश मोर व देवेंद्र मोर हे तर प्रमुख अतिथी म्हणून किसान महाविद्यालयाचे डॉ. माणिक बागले व मारवड महाविद्यालयाचे डॉ. जितेंद्र माळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महादेव तोंडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. समुपदेशक श्री अश्विन पाटील यांनी एकजुटीने एच. आय. व्ही. एड्सला लढा देऊ नवे परिवर्तन घडवू या घोषवाक्याने यावर्षाची जनजागृती असून विद्यार्थ्यांना एड्स जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. एड्स ह्या आजाराची विविध कारणे, त्याविषयीचे असलेले समज, गैरसमज तसेच- आधुनिक काळामधे विकसित झालेली उपचार पद्धती याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या संबंधात ग्रामीण रुग्णालयाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांविषयी तसेच शहरात उपलब्ध असलेल्या उपचार पद्धतींविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष, प्राचार्य डॉ एच एम पाटील यांनी ह्या उपक्रमातून झालेली जनजागृती,हि विधार्थिनी आपल्या, मित्रानपर्यंत व परिसरातील, व्यक्तींपर्यंत पोहोचवावी असे आव्हान केले. यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. लीलाधर पाटील, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. रवींद्र चौधरी डॉ. भगवान भालेराव आदींनी प्रयत्न केले.



