अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि एकतेचा सण. पण यंदा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी ही दिवाळी काळोख घेऊन आली आहे. निसर्गाच्या भीषण तडाख्याने महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.
कुठे छप्पर कोसळले, कुठे उभे पीक वाहून गेले, कुठे आयुष्याची स्वप्ने पाण्यात गडप झाली.
आज असंख्य घरांची चूल विझली आहे.लेकरांच्या डोळ्यांत भुकेची वेदना आणि आई-बापांच्या चेहऱ्यावर उद्याची चिंता झळकत आहे.
मनमुक्त फाउंडेशन आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करत आहे.
चला या दिवाळीत त्या आपल्या पूरग्रस्त बांधवांनाही सहभागी करून घेऊया. या दिवाळीत आपण “माणुसकीचा दीप” पेटवूया.
आपण दिलेली आर्थिक मदत आम्ही फराळ, मिठाई, दिवे, कपडे, अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक साहित्य खरेदी करून
पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवणार आहोत.जेणेकरून त्यांच्या घरातही आशेचा, आनंदाचा आणि माणुसकीचा दीप उजळेल.
चला, या दिवाळीत आपण वेगळ्या अर्थाने सण साजरा करूया
फटाक्यांचा आवाज नव्हे, तर माणुसकीचा प्रकाश पसरवूया.
फराळाच्या ताटांपेक्षा अन्नदानाचा प्रसाद वाटूया. कारण माणुसकीच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी दिवा दुसरा नाही.
आपण लावलेला एक दिवा कुणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकतो.
चला, माणुसकीचा दीप पेटवू या पूरग्रस्तांच्या जीवनात उजेड फुलवू या!
*अकाउंट डिटेल्स*
Account Name: MannMukta Foundation
Account No: 40211478990
Branch: Pedali (Raigad)
IFS Code: SBIN0009204
MICR Code: 410002825



