अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज.
अमळनेर येथील कै. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेचे सुभाष पाटील घोडगांवकर हे महाराष्ट्र
राज्यांतील पहिले लाभार्थी ठरले आहे. तसेच पत्रकार पेन्शन योजनेचे तालुक्यातील एकमेव पत्रकार आहेत.
सविस्तर वृत्त की, जेष्ठ पत्रकारांसाठी महाराष्ट्र शासनाची कै शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजना असून जे शासनमान्य पत्रकार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो. या योजनत पत्रकारांना अपघात,कायम अपंगत्व तसेच दुर्धर आजार, आकस्मिक मृत्यू आल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला मदत मिळत असते. सदर योजना ही 1ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयन्वये करण्यात आली आहे.
सदर योजनेचा लाभ अमळनेर तालुक्यांतील जेष्ठ शासन मान्य पत्रकार श्री सुभाष पाटील घोडगांवकर यांना प्राप्त झाला असून त्यांना कायम स्वरूपी अपंगत्व आल्यामुळे शासनाने त्यांना एकलाखाचे अर्थ सहाय्य केले आहे.सदरचा निधी दि 24 रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. याकरिता त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात आठ महिन्यापूर्वी अर्ज दाखल केला होता.


