मारवड महाविद्यालयातील नाजमीन पठाण आणि पूनम भिल यांना सुवर्णपदक

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

मारवड ता.अमळनेर येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी नाजमीन बी. मेहमूद खाॅ.पठाण (टी.वाय. बी. ए.) राज्यशास्त्र विषयात अभूतपूर्व यश संपादन करून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून राज्यशास्त्र विषयात संपूर्ण विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवत ‘गोल्ड मेडल’ पटकावले आहे, तसेच अनुक्रमणे दुसरी विद्यार्थिनी पूनम नंदनाल भिल हिने (टी. वाय.बी.ए.) मराठी या विषयात उज्वल असे यश प्राप्त करून कष्ट मेहनत व आत्मविश्वासाने कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून मराठी विषयात संपूर्ण विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवून ‘गोल्ड मेडल’ पटकावले आहे . या दोन्ही विद्यार्थिनींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाचा दीप उजळत आपल्या महाविद्यालयाचे नाव, गावाचे नाव, परिसर राज्यभर उज्वल केले आहे महाविद्यालयांचा अभिमान आणि परिसरात गौरव वाढला आहे.
त्यांच्या यशस्वी प्रेरणा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशा दाखवेल.
या उज्वल यशानंतर संस्थेचे अध्यक्ष. मा. आबासो. श्री. जयवंतराव मन्साराम पाटील उपाध्यक्ष. आबासो.श्री. देविदास शामराव पाटील सचिव आबाजी. श्री. देविदास बारकू पाटील संचालक भैय्यासो. श्री. दिनेश वासुदेव साळुंखे आणि सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.देसले प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले आणि मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page