चोपडा प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पार्टी) चोपडा तालुक्याची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.या बैठकीत पक्षाची आगामी निवडणूक तयारी, बूथस्तरावरची संघटनबांधणी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्षांनी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की —“विद्यमान तालुकाध्यक्ष लवकरच आपला राजीनामा देणार असून, येत्या 24 तासांत नव्या तालुकाध्यक्षांची घोषणा केली जाईल.”
या घोषणेनंतर बैठकीत नवा उत्साह आणि नव्या नेतृत्वाची चाहूल निर्माण झाली आहे.
जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हटलं की *“ही लढाई पदांची नाही, विचारांची आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांवर चालत आपण एकजुटीने काम करायचं आणि येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित करायचा.”*
या प्रसंगी पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, निरीक्षक N. D. पाटील,च माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरख तात्या, चो.सा. का.चे माजी चेअरमन नानासो अतुल ठाकरे, चो.सा. का.संचालक डी. पी.बापू,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे कार्याध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला,महिला प्रदेश उपाध्यक्ष विजयाताई पाटील, माजी सभापती जगन काका, सतीश बोरसे, प्रमोद बोरसे आदी मान्यवर व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखी निश्चय केला — “पक्ष बदलू शकतो, पण विचार नाही!” “आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा उंच फडकवूया!
चोपड्यातील या आढावा बैठकीने पक्षात नवा आत्मविश्वास निर्माण केला असून,
नवं नेतृत्व, नवी दिशा आणि विजयाचा एकच मार्ग — राष्ट्रवादी विचार!



