अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार चि. सिद्धांत राहुल निकम हा NFSC शिष्यवृत्ती करिता पात्र ठरला आहे.
चि. सिद्धांत हा M.Pharmacy हि पदवी 83.69% गुणांसह उत्तीर्ण झालेला आहे. तो 03 वेळा G.PAT (Graduate Pharmacy Aptitute Test) उत्तीर्ण झाला आहे. तो 03 वेळा NET परीक्षा उत्तीर्ण झालेला असून एकदा GATE परीक्षा देखील उत्तीर्ण झालेला आहे.
चि. सिद्धांत हा सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर केंदीय विश्वविद्यालय लखनौ ( उत्तर प्रदेश) येथे Ph.D. करीत आहे. तो समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे कार्यरत असणाऱ्या प्रा.डॉ.राहुल निकम यांचा मुलगा आहे.
चि. सिद्धांत याच्या यशाबद्दल त्यांचे रयत संदेश न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन…




