पातोंडा येथे 18 ऑक्टोबर ला उमेश काटे यांचे होणार व्याख्यान
अमळनेर- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर आणि पातोंडा परिसर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एकादशीच्या निमित्ताने ‘भारतीय संत साहित्याचा जागर’ या अंतर्गत एक विचारप्रवर्तक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पातोंडा (ता. अमळनेर) येथील श्री दत्त मंदिर चौकात शनिवारी १८ ऑक्टोबर ला रोजी सायंकाळी ६ वाजता प्रमुख वक्ते उमेश काटे हे “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज — जीवन कार्य” या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद संदिप बाबुराव घोरपडे (अध्यक्ष, मसाप अमळनेर) तर उद्घाटन प्रदीप रामदास लोहारे (सेवानिवृत्त आदर्श शिक्षक) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे समन्वयक मनोहर नेरकर असून प्रास्ताविक निरंजन पेंढारे तर सूत्रसंचालन शरद पाटील करतील. या प्रसंगी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कार्यवाह विजया गायकवाड, कोषाध्यक्ष उमेश काटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य नरेंद्र निकुंभ, भाऊसाहेब देशमुख, प्रा. डॉ. रमेश माने, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर मराठे, दिलीप सोनवणे, भारती सोनवणे, गोकुळ बागुल, सुनिता पाटील व प्रा.बी.एन. चौधरी उपस्थित राहणार आहेत. “संतांच्या विचारांनी माणसात माणुसकी फुलते, तुकडोजींच्या वाङ्मयातून ग्रामजागरणाचा प्रकाश पसरतो” या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
[16/10, 7:47 pm] Dinesh Naik Amalner: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाची मेजवानी
पातोंडा येथे 18 ऑक्टोबर ला उमेश काटे यांचे होणार व्याख्यान
अमळनेर- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर आणि पातोंडा परिसर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एकादशीच्या निमित्ताने ‘भारतीय संत साहित्याचा जागर’ या अंतर्गत एक विचारप्रवर्तक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. पातोंडा (ता. अमळनेर) येथील श्री दत्त मंदिर चौकात शनिवारी १८ ऑक्टोबर ला रोजी सायंकाळी ६ वाजता प्रमुख वक्ते उमेश काटे हे “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज — जीवन कार्य” या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद संदिप बाबुराव घोरपडे (अध्यक्ष, मसाप अमळनेर) तर उद्घाटन प्रदीप रामदास लोहारे (सेवानिवृत्त आदर्श शिक्षक) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे समन्वयक मनोहर नेरकर असून प्रास्ताविक निरंजन पेंढारे तर सूत्रसंचालन शरद पाटील करतील. या प्रसंगी ‘मसाप’चे उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कार्यवाह विजया गायकवाड, कोषाध्यक्ष उमेश काटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य नरेंद्र निकुंभ, प्रा. डॉ. रमेश माने, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर मराठे, दिलीप सोनवणे, भारती सोनवणे, गोकुळ बागुल, सुनिता पाटील व प्रा.बी.एन. चौधरी उपस्थित राहणार आहेत. “संतांच्या विचारांनी माणसात माणुसकी फुलते, तुकडोजींच्या वाङ्मयातून ग्रामजागरणाचा प्रकाश पसरतो” या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.