द्रौ.रा.कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने तृणधान्य विषयी जनजागृती
अमळनेर रयतसंदेश प्रतिनिधी:-
येथील द्रौ.रा.कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य विषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.
पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्त्व याबाबत तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक कृषीअधिकारी योगिता लांडगे यांनी विद्यार्थ्यांना पोष्टिक तृणधान्याची ओळख करून देऊन त्याचे आहारातील महत्त्व पटवून सांगितले. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी दिपाली सोनवणे यांनी रोज एक तरी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करावा व त्याचे महत्त्व पटवून सांगितले तसेच विद्यार्थ्यांना रोज दैनंदिन आहारात एक तरी पौष्टिक तृणधान्य खावे याबाबत शपथ योगिता लांडगे यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सुर्यवंशी, जेष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर,क्रीडा शिक्षक जे व्ही बाविस्कर, करुणा शिक्षक डि.एन.पालवे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतिभा साबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.