अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मोबाईल आणि टीव्ही पासून दूर घेऊन जाण्याकरिता तसेच मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसक वृत्ती कमी करण्याकरिता गायन वादन शाळेचा घाट घातला.या गायन, वादन कार्यशाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून तुषार पुराणिक यांनी दहा दिवस आपली संगीत सेवा दिली तसेच बेथेल चर्च मधील फादर गावित सर तसेच खानदेशातील बासरी वादक व प्रचारक योगेश पाटील सर यांनी देखील कार्यशाळेमध्ये दोन सत्रात हजेरी लावली आणि मुलांना संगीत क्षेत्राचा जवळून परिचय करून दिला या गायन वादन कार्यशाळेची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व शिक्षण तज्ञ तसेच रंगकर्मी यांनी मांडली संचालक मंडळाने भरीव योगदान दिले तसेच तीनही शाळातील मुख्याध्यापक अनिता बोरसे,सुनील पाटील, संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सूचित केले व गावातील इतर शाळांमधील संगीत प्रेमी विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचा प्रचार प्रसार केला दहा दिवसातील या कार्यशाळेत मुलांना संगीता विषयी आवड होतीच तिला वृद्धिंगत करण्यामध्ये कार्यशाळेचा मोठाच वाटा आहे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बासरीवर राष्ट्रगान तसेच तबल्याचे प्रारंभिक बोल व कीबोर्डला जवळून परिचय करून घेतला मुलांचा हा दहा दिवसाचा कालावधी अत्यंत संगीतमय आणि आनंदी गेला असे मुलांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले अशाप्रकारे दिनांक २६ऑक्टोबर पासून सुरू झालेली कार्यशाळा दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी तिच्या समारोपप्रसंगी रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी सांगितले की जीवन प्रवास म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या आतील कालावधी हा कालावधी ताणतणावापासून दूर अनेक मानसिक गुंत्यांना दूर करताना संगीत क्षेत्राशी ज्याचा परिचय असतो त्याला जीवन अतिशय सुसह्य असते जेव्हा जेव्हा तणावग्रस्त व्यक्ती संगीताच्या संपर्कात येतो तेव्हा तेव्हा त्याला जीवनात अधिक रस वाटू लागतो याकरिता समारोपप्रसंगी संदीप घोरपडे यांनी जीवनात आत्मसात करण्यासाठीच्या १४विद्या व ६४ कलांचा यथा सांग परिचय करून दिला आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक कलावंत दडलेला असतो फक्त त्याची ओळख करणारा कलापारखी माणूस त्या व्यक्तीच्या संपर्कात आला म्हणजे त्या कलावंताला आपली दिशा सापडते अशा प्रकारे शिबिरातील मुलांना भावी आयुष्यासाठी व पुढील कला प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यशाळेत वैभव भैय्यासाहेब पाटील, मीत योगेश पाटील, निलय प्रसाद ओवे, अर्चना निंबा चव्हाण, विआन स्वप्नील पाटील, अन्वी पाटील या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन संगीताची ओळख करून घेतली आणि आनंद घेतला.




