आश्रमशाळा पिंपळे बु. येथील वासुदेव पावरा याची राज्यस्तरावर निवड.

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

दि. 05/11/2025 ते दि.07/11/2025 या दरम्यान विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा नाशिक येथे नुकत्याच संपन्न झाल्यात. यामध्ये अनुदानित आश्रमशाळा पिंपळे बु.ता- अमळनेर येथील इयत्ता 12वी विज्ञान शाखेचा खेळाडू वासुदेव भिमसिंग पावरा याने 19 वर्षआतील (मुले) या वयोगटात लांब उडी या खेळ प्रकारात प्रथम क्रमांक (6.15 मी.) मिळविला असून त्याची राज्यस्तरावर निवड झालेली आहे, वासुदेव आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ विद्याताई पाटील, सचिव श्री युवराज पाटील, मान प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेब, सहाय्य्क प्रकल्प अधिकारी श्री पवन पाटील साहेब, विस्तार अधिकारी श्री विश्वास गायकवाड प्राथमिक,माध्यमिक मुख्यद्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून वासुदेवचे कौतुक करण्यात आले..व पुढील वाटचालीसाठी त्यास शुभेच्छा देण्यात आल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page