क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरा

अमळनेर: रयत संदेश न्यूज नेटवर्क

लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.चौधरी होते. यावेळी मुख्याध्यापकांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका सायली देशपांडे, शिक्षक मधुकर सोनार, भूषण महाले, आशा सोनवणे, रेखा कांबळे तसेच विद्यालयाचे भाऊसाहेब नचिकेत महाले, नाईक सुधीर माळी, शिपाई प्रविण गांगुर्डे, अनिता बिऱ्हाडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page