अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये श्री गुरुतेग बहादूर शहिदी समारंभ निमित्त वकृत्व स्पर्धा. अमळनेर दिनांक 17. 2. 2026 वार मंगळवार रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे श्री. गुरु तेग बहादूर साहेब शहिदी समारंभ निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. जे.एस.पाटील हे अध्यक्षस्थानी होते.व श्री.दिलीप पाटील,श्री. आर एम देशमुख,श्री. साळुंखे सर,श्री.मुकेश पाटील,श्री. दीपक महाजन, व सौ. वंजारी मॅडम उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.त्यांनी श्री. गुरु तेग .बहादूर साहिब यांच्या कार्याचा व साहित्याचा परिचय आपल्या भाषणात करून दिला. या स्पर्धेत रेणुका लाड नववी ब प्रथम भूमिका पाटील नववी अ द्वितीय उर्वशी महाजन आठवी ब तृतीय व आदिती पाटील आठवी अ उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले. शिक्षकांमधून श्री .देशमुख सर,श्री . मुकेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात श्री. जे. एस.पा.टील यांनी श्री गुरुतेग बहादुर साहिब यांच्या देशभक्तीचा व त्यांच्या साहित्याचा परिचय करून दिला . त्यांना” हिंद दी चादर” हा किताब का दिला याच्या विषयी सांगितले .कार्यक्रमास शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष श्री . आबासाहेब हेमकांत पाटील व संस्थेचे सचिव श्री .दादासाहेब संदीप घोरपडे यांनी दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप पाटील सर यांनी केले तर आभार श्री दीपक महाजन सर यांनी मानले.



