आदर्श पत्रकार ईश्वर महाजन यांना ‘गुणवंत पत्रकार’ पुरस्काराने सन्मान

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

शिवरात्रीच्या पावन निमित्ताने मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्म प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६” अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात देवगाव-देवळी येथील माध्यमिक शिक्षक तथा अमळनेर तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ईश्वर रामदास महाजन यांना “गुणवंत पत्रकार पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले. समाजहिताच्या जाणीवेने पत्रकारिता करत सर्व क्षेत्रातील बातम्यांना न्याय देत समाजाचे देणे फेडण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कार्याची दखल घेत मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जनमत प्रतिष्ठानचे पंकजभाऊ नाले व विश्वस्त मंडळाने त्यांना हा सन्मान बहाल केला.

जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते ईश्वर महाजन यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले. सभागृहात उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा. डायट प्राचार्य निळकंठ आप्पा गायकवाड उपस्थित होते. तसेच आमदार राजू मामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे, गटशिक्षणाधिकारी तथा ग.स संचालक विजय पवार, सुनील पाटील (शिरपूर), विधीतज्ञ अॅड. निखिल पाटील, मराठी सिनेगायक संघपाल तायडे, अर्चना माळी, भारतीताई काळे, नीताताई सोनवणे, सुनील पाटील, मुकुंद रोटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जी.एच. रायसोनी कॉलेज, जळगाव येथील डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशनचे एचओडी रफिक शेख यांनी भूषविले.सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे सर व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईश्वर महाजन यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल

व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, व्हाईस आँफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे,व पदाधिकारी,

 

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीपजी घोरपडे, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक एस डी देशमुख,अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बापू माळी, साने गुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई देसले,

सह मित्रपरिवार यांनी महाजन यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page