युग कवी वामन दादा कर्डक यांची १०१ वी जयंती साजरी*

*युग कवी वामन दादा कर्डक यांची १०१ वी जयंती साजरी*

अमळनेर ता.प्रतिनिधी : बापूराव ठाकरे.

अमळनेर येथील प्रबुद्ध विहारात
महाकवी वामनदादा कर्डक यांची १०१ वी जयंती गीत गायन करून साजरी करण्यात आली.
महाकवी वामनदादा यांच्या प्रतिमेचे सामुदायिक पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर अजय भामरे सर बापूराव ठाकरे सर यांनी वामन दादांची गीते गायली .यावेळी महाकवी वामन दादा कर्डक मंच स्थापन करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.शिवाजीराव पाटील ( राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा) इंगळे साहेब
(सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक ) विश्वास पाटील (अध्यक्ष, गावरानी जागल्या सेना)
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदानशिव, अर्जुन संदानशिव, रविंद्र सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे,
सोपान भवरे सर, कमलाकर संदानशिव सर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल डोळस यांनी केले सूत्रसंचालन अजय भामरे सर यांनी केले तर आभार बापूराव ठाकरे सर यांनी मानले.

You cannot copy content of this page