साने गुरुजी कन्या हायस्कुल अमळनेर शाळेचा निकाल 99.22%

अमळनेर तालुका प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सानेगुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथील इयत्ता 10वी चा निकाल हा 99.22% लागला असून ,विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो व विद्यार्थ्यांचे यश हे शाळेचे यश असते.शाळेच्या निकालाची वैशिष्ट्ये शाळेचा निकाल 99.22 %एकूण प्रविष्ठ वि‌द्यार्थिनी 129पैकी  128 उत्तीर्ण झाले.

90 % पेक्षा जास्त गुण 13 वि‌द्यार्थिनी 75% पेक्षा जास्त गुण 66 विद्यार्थिनी 60 % पेक्षा जास्त गुण 45 विद्यार्थिनी 60% पेक्षा कमी गुण 17 विद्यार्थिनी

यावर्षी शाळेचा निकाल 99.22% लागला व यशाची परंपरा यावर्षी देखील साध्य झाली. सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे, पालकांचे व शाळेच्या मुख्याध्यापिका. श्रीमती. अनीता बोरसे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. आबासाहेब हेमकांत पाटील, सचिव मा. श्री. दादासाहेब. संदिपजी घोरपडे, माजी अध्यक्ष आप्पासाहेब मा. श्री. गुणवंतराव पाटील, शालेय समिती अध्यक्ष मा. प्रा. डॉ. श्री. एस.जे. शेख, जेष्ठ संचालक मंडळ व पालक वृंद यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page