अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. सुलोचनाताई वाघ यांची निवड

*अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क*

अमळनेर महिला मराठा समाज महिला मंडळ गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे त्यात सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली त त्या उच्च शिक्षित आहेत एम ए बी एड मराठी आणि राज्यशास्त्र या विषयातून त्यांनी पदवी घेतलेली आहे.

तसेच त्या जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष देखील आहेत त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा मजूर फेडरेशन संचालिका म्हणून तीन वर्षापासून कार्यरत आहेत सामाजिक काम करताना त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम गेल्या वीस वर्षापासून त्या सतत कार्यरत आहेत तसेच मानव अधिकार संरक्षण समिती दिल्ली या समितीच्या त्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे गेल्या 25 वर्षात अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत त्यांचा अनुभव मोठा आहे.

आज मराठा समाज महिला मंडळाने सर्वानुमते त्यांची ही निवड केली या निवडीबाबत सन्माननीय तिलोत्तमा ताई पाटील सन्माननीय जयश्रीताई पाटी लीनाताई पाटील अलकाताई मंगला पाटील सुनिता पाटील कमल अक्का पाटील मनिषा ताई पाटील माधुरी पाटील भारतीताई पाटील डॉक्टरभारतीताई आधार संस्था रागिनी पाटील प्रभाताई पवार पद्मजा पाटील शीला पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या येणाऱ्या 2026 वर्षभरात महिलांसाठी आरोग्यविषयक व्यवसाय विषयक तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतील.

तसेच समाजातील सर्व मराठा समाजातील तरुण मुला-मुलींना मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा प्रयत्न व महिलांवर होणारे अन्याय अत्याचार यावर आवाज उठवण्याचे काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page