शहिद शुभम बिऱ्हाडेच्या स्मृती दिनानिमित्त दातृत्व

*शहिद शुभम बिऱ्हाडेचा स्मृती दिन*
*वृद्धाश्रमात स्नेहभोजन देऊन संपन्न*

अमळनेर रयतसंदेश न्युज:-

कल्याण : अत्यंत उमद्या तरुण सैनिकास अकाली जाण्याने परिवारास किती भयंकर दुःखातून जावं लागत त्याची प्रचिती काल शहीद शुभम च्या
प्रथम स्मृती दिनानिमित्त जाणवली.अत्यंत गंभीर वातावरणात शहीद शुभम यास पुण्यानुमोदन करून बुद्ध पूजन करण्यात आले.
बौद्ध पूजाविधी आणि स्मृती दिन कार्यक्रम बौद्धाचार्या आयुष्यमाणिनी कमला ताई इंगोले यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
अत्यंत कमी वयात संगीतात विशारद करून नौदलात सामील होऊन आपल्या कलेने असंख्य चाहत्यांना मोहिनी घालणाऱ्या शुभमच्या आठवणीने उपस्थितांना गहिवरून आलं होतं.त्याच्या सेवा काळात त्याने जगातल्या २२ देशांना भेटी दिल्यात आणि शेकडो लाईव्ह कंसॉर्ट सादर करून सैनिकांमध्ये उत्साह पेरण्याचं काम त्यानं केलं.
प्रसंगी जी के खाऊगोळी, गायकवाड साहेब, जितेंद्र येळवंनकर, चेतन अहिरे, शिखा मॅडम, शेजवळ साहेब, संगीता ताई भालेराव, भालेराव साहेब,ललित पाटील, हर्षल गोपाळ, मल्हार गाढे, ऍड रणजित बिऱ्हाडे,गौतम मोरे, शरद दादा ठाकूर, निरंजन इंगोले, प्रा पांडे सर,कदम साहेब आणि हौसिंग सोसायटी मधील शेजारी, मित्र,
नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. यावेळी शुभमच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला.
डॉ जाधव यांच्या रुग्णालयातील वृद्धाश्रम विभागात स्नेह भोजन आयोजित करण्यात आले होते. वृद्ध आजी आजोबा यांच्या समावेत झालेल्या स्नेह भोजनाने स्मृती दिनाने वेगळीच उंची गाठली.सर्व आप्तेष्टांच्या सांत्वन आणि आधार देणाऱ्या शब्दांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या आयोजनात बाळू बिऱ्हाडे, सुनीता बिऱ्हाडे, रोहिणी बिऱ्हाडे आणि शुभम चा सैन्यातील सहकारी हर्षल गोपाळ, ऍड रणजित बिऱ्हाडे यांनी पुढाकार घेतला.

You cannot copy content of this page