*सत्यपाल महाराजांची सत्यवाणी 29 सप्टेंबरला अमळनेरात*
अमळनेर रयतसंदेश न्युज:-
गोरगरिबांच्या कैवारी, समाज सेविका, अदिवासी बांधवांसाठी अहोरात्र झटणाऱ झुंजार नेतृत्व मा.प्रतिभाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 ला सांयकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेरात प्रथमच महाराष्ट्राचे कीर्तन सम्राट,सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे.संगीत,खंजिरी,अभंग, प्रबोधनाची गाणी यांचा सुरेख संगम अनुभवण्यासाठी
सत्यपाल महाराजांचे कीर्तन
अमळनेरकर बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सत्यपाल महाराज यांच
आगळ वेगळं कीर्तन बघण्याचं, ऐकण्यास आणि अनुभवायची अनोखी संधी यानिमित्ताने अमळनेरकरांना असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
29 सप्टेंबर ला सायंकाळी 6 वाजता सत्यपाल महाराज यांचे कीर्तन एक अनोखी मेजवानी आहे.सर्व वयोगटातील प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला अवगत असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज अमळनेर नगरीत येत आहेत.
वेळेवर पोहचून आपली सीट राखीव करावी असे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.