अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ आयोजित १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन चोपडा तालुका बैठक संपन्न.
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
दिनांक ३ व ४ फेब्रुवारी २०२४ अमळनेर येथे आयोजित १८ विद्रोही मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मराठा समाज कार्यालय संजीवनी नगर चोपडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चोपडा तालुक्यातील पुरोगामी विचारसरणीचे विविध संघटनांचे पदाधिकारी साहित्यिक, लेखक, कवी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रा. डॉ.लीलाधर पाटील यांनी विद्रोही साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी सांगितली विद्रोह साहित्य संमेलन म्हणजे काय? ते कशासाठी महत्त्वाचे आहे हे पण नमूद केले विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे शोषणाच्या विरोधी विचार मांडण्याचे व्यासपीठ आहे असे सांगितले दलित, कामगार शेतकरी, कष्टकरी, आदिवासी ,महिला यांना न्याय मिळवून देताना साहित्य जागर झाला पाहिजे आणि त्याची संधी आपल्याला अंमळनेर ते उपलब्ध होत आहे तरी आपण सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन केले यानंतर बोलताना रणजीत शिंदे सर यांनी विद्रोह साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या ताकदीने वाढवावा अशी सूचना मांडली. प्रा. अशोक पवार म्हणाले आपण सर्व सामाजिक पुरोगामी विचारसरणी चे लोक एकत्र आले पाहिजेत आणि ही चळवळ पुढे नेली पाहिजे, पुढच्या पिढीसाठी फार महत्त्वाचे आहे आणि विद्रोहीचे व्यासपीठ वापरून ताकद निर्माण करावी असे आवाहन केले यानंतर बोलतांना अशोक बिर्हाडे साहेब( सेवा निवृत्त, गटशिक्षणाधिकारी), इंजि.गौतम मोरे साहेब, बापूराव ठाकरे, प्रमोद चौधरी सर यांनी विचार मांडले चोपडा येथील प्रा.संदीप पाटील सर यांनी आर्थिक रसद जास्तीत जास्त पूर्व आणि चळवळीसाठी काम करण्यासाठी स्वतःला झोकून देऊ असे सांगितले त्यानंतर देवेंद्र पाटील माजी संचालक बँक जळगाव यांनी सांगितले की विद्रोही साहित्य संमेलन आयोजनामध्ये चोपडा तालुक्याचा सर्वात मोठा वाटा असेल, आम्ही पूर्ण ताकतीने उभे राहू असे आश्वासन दिले या बैठकीला दीपक पाटील, ज्ञानेश्वर निकम, देवेंद्र पाटील, राजेंद्र साळुंखे,देवेंद्र कर्दपवार, अभिजीत देशमुख, विवेकानंद शिंदे, दिनेश संदानशिव, गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील ,दिनेश पाटील ,विशाल हौसे ,विजय पाटील ,नामदेव शिरसाठ, सतीश बोरसे सर, संजय पाटील ,मयूर पाटील, गोपाल कोळी, बारेला सर, अँड. प्रणय ठाकरे, सौरव ठाकरे ,मयूर पाटील आणि अमळने वरून आलेले माजी नगरसेवक श्याम पाटील ,दयाराम पाटील सर यांनी सुत्रसंचालन केले, अजिंक्य चिखलोदकर उपस्थित होते.मराठा सेवा संघाचे चोपडा ता.अध्यक्ष एकनाथ पाटील सर यांनी आभार मानले.