अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू*

*अमळनेर तालुक्यातील पाच जणांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू*

अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब राजस्थान मधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना कंटेनर ला धडक लागून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे वय ५५ रा बेटावद व योगेश धोंडू साळुंखे रा पिंपळे रोड अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब गाडी क्रमांक एम एच ०४ ,९११४ वर राजस्थान फिरायला जात असताना १३ रोजी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनर ला धडक दिल्याने धनराज सोनवणे , त्यांची मुलगी नाव माहीत नाही , गायत्री योगेश साळुंखे वय ३० , प्रशांत योगेश साळुंखे वय ७ , भाग्यलक्ष्मी साळुंखे वय १ यांचा जागीच मृत्यू झाला. धनराज सोनवणे यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी बोलणे केले.

You cannot copy content of this page