रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी ) – 2 ऑक्टोबर गांधी जयंती *एक दिवस अवघे काही तास गांधी स्मरणात धरू उपवास*
अनेक दिवसापासून भारत देशातील बदलते वातावरण ज्यात आर्थिक सामाजिक शैक्षणिक सामाजिक या सर्व विचारांचा लेखाजोखा मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यास कार्यकर्त्यांना फर्मान सोडले की गांधीजींच्या कार्याचा जनमानसापर्यंत संदेश पोहोचवा तो आदेश शिरसावंद मानत संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वात अमळनेर तालुका काँग्रेसने एक दिवशीय उपवासाचे आयोजन साने गुरुजी पुतळ्या जवळ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करण्याचे ठरविले व त्याला संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात संदीप घोरपडे यांनी सुचित केले की या दिवसभराच्या उपवास स्थळी सर्वांना व्यक्त व्हायला संधी द्या यात तरुणाई असेल महिला असतील शेतकरी असतील कष्टकरी विविध धर्मातील धर्मप्रमुख विविध समाजातील समाज धुवून या सर्वांना आमंत्रित करून आपण त्यांना मुक्तपणे त्यांच्या भावना मांडण्यास संधी देऊया आणि एक मुखाने त्या विषयाला पाठिंबा मिळाला त्याप्रमाणे नियोजन केल्याने अनेक लोक आपापल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी साने गुरुजी पुतळ्यासमोर प्रचंड गर्दी करत हजेरी लावत होते.
दिवसभरात हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली यात प्रामुख्याने आर्थिक क्षेत्रातील तज्ञ बोरसे साहेब यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने मांडला बोरसे साहेब यांनी एकूणच अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी उद्योग क्षेत्रातला उद्योगाला उभारी देणारा कामगार शेतीप्रधान देशांमध्ये शेती उत्पन्नावर आधारित एकूणच इतर व्यवसाय असताना शेतीमालाला न मिळणारा हमीभाव कर्मचारी वर्गाला जुनी पेन्शन न मिळाल्याने त्यांच्यामध्ये पसरलेली नाराजी आणि अत्यंत अल्प उत्पादन क्षेत्रांमध्ये उद्योगित जो छोटा व्यापारी वर्ग आहे त्याच्या समस्यांचा पाढा वाचला व आपली आर्थिक स्थितीत होणारी अधोगती श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे गरीब अधिक गरीब होत आहेत ही भूमिका अत्यंत परखडपणे मांडली व हे देखील मान्य केले की या आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी मला अजून एकदा व्यवस्थित संधी मिळाली तर मी भारतीय अवश्य अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकेल त्यानंतर सामाजिक विषमतेवर अनेकांनी आपली मनोभूमिका मांडताना धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये पोट जातीमध्ये ज्या भांडणे लावण्याचा प्रकार काही संधी साधू करत आहेत त्यांचा खरपूस समाचार घेतला व त्यातूनच अनेकांनी आमचे काही चुकत असेल तर आमच्या लक्षात आणून द्या तुमचे काही चुकत असेल तर तुम्हीही समजून घ्या. शिक्षण क्षेत्राची झालेले बाजारीकरण व त्यातून गोरगरिबांच्या वाट्याला येणारे शिक्षण दुरापास्त होईल अशी भावना अनेकांनी मांडली यात प्रामुख्याने निवृत्त केंद्रप्रमुख भागवत गुरुजी हिम्मत गुरुजी यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष भूमिका निभावणारा व संविधानावर आधारित राज्य करणारा पक्ष ही पक्षाची सर्वसमावेशक भूमिका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी विशद करताना आम्ही आजही त्याच पद्धतीने राज्य करणार आहोत व लोकशाहीचा प्रचार व प्रसार करणार आहोत ज्या लोकशाहीच्या निर्माण साठी आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बलिदान देऊन या देशाची उभारणी केली महिलांचे प्रश्न मांडत असताना महिलांवर होणारे अत्याचार मनिपुर ते बदलापूर असा जो प्रवास झालेला आहे जो विनयभंग बलात्कार लैंगिक शोषण या माध्यमातून मांडणी करताना ती लोत्तमाताई वसुंधरा लांडगे शबाना शेख यांनी यापासून महिलांचा बचाव करण्याकामी पुरुषांना पुढाकार घ्यावा लागेल या सर्व भूमिका विशद करताना आरक्षणाचा मुद्दा येथे आवर्जून पुढे आला येथेही अनेकांनी न भिता खुलेपणाने आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन अथवा विरोध याचाही येथे विवाह केला यात विजय महाजन प्रताप महाजन व त्यांच्यासोबत आलेला तीस-पस्तीस तरुणांचा समूह आपली भूमिका प्रकार पणे मांडून अत्यंत सुखावला ग्रामीण भागातून जवळजवळ दहा भजनी मंडळांनी हजेरी लावून तुकाराम महाराजांच्या भागवत धर्माची पताका कशा पद्धतीने तेली तांबोळी विविध जाती धर्माला सोबत घेऊन जाणारी आहे अशी भजन भारुडे गवळणी सादर करून धमाल उडवून दिले याचबरोबर समाजकार्य महाविद्यालयातील अमळनेर व चोपडा येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्याचा सादरीकरण करून एकूणच भारत देश हुकूमशाही कडे कसा प्रवास करीत आहे याचा दृश्य पुरावा आपल्या अभिनयाच्या माध्यमातून व गीतांच्या माध्यमातून उपस्थित त्यांना दिला प्रबोधन गीतांनी अनेकांची मनोरंजनातून हसून हसून दमछाक झाली.
यासोबतच ग्रामीण भागातील गावरान जागल्या याच्या कार्यकर्त्यांनी येऊन शेतकऱ्यांच्या वास्तव स्थितीचे अभ्यासपूर्ण मांडणी करून उपस्थित त्यांना दर्शन दिले आणि या सर्व उपस्थित त्यांना उपवास करते संदीप घोरपडे यांनी आपल्या मार्मिक टिपणीने अनेकांच्या डोळ्यात अंजन घातले व संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचा समारोप होताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम बापू व लोटन चौधरी यांच्या हस्ते सरबत घेऊन गांधीजींच्या कार्यकर्तुत्वाच्या भजनाने या उपवासाच्या समारोपप्रसंगी उपस्थित त्यांनी गांधीजी शास्त्रीजी साने गुरुजी यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला या सर्व कार्यक्रमाला उपस्थित यांची नावे पुढीलप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी शहराध्यक्ष मनोज पाटील माजी अध्यक्ष गोकुळ बोरसे श्याम पवार राजू खापरेकर रोहिदास सुखा पाटील रामकृष्ण पाटील मदन वामन पाटील संभाजी लोटन पाटील तुकाराम चौधरी संतांची तुषार संतांचे एससी तेले अशोक पवार महेश पाटील सुलोचना वाघ किडी पाटील नयना पाटील आहे यासह यासह हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती देऊन या उपवास स्थळाला भेट देऊन अनेकांचे मनोगते ऐकून विचार ऐकून प्रसन्न मनाने सांगता केली