भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप घोरपडे सर यांचे कडून भा.रा.काँ. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमळनेर विधानसभा क्षेत्राचा जाणून घेतला लेखाजोखा.
अमळनेर :- रयतसंदेश न्युज नेटवर्क.
एक जानेवारी 2024 रोजी जळगाव येथे भारतीय राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसचे अधिवेशन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते त्यापूर्वी रावेर लोकसभा मतदारसंघ व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला
त्या अंतर्गत अमळनेर काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते संदीप घोरपडे यांचे कडून नाना पटोले यांनी मागील कामाचा आढावा व भविष्यातील वाटचाल जाणून घेतली त्या अनुषंगाने समोरच बसलेल्या लोक संघर्ष मोर्चाच्या व नुकत्याच काँग्रेस पक्षात प्रवेशित झालेल्या प्रतिभाताई शिंदे यांचा हवाला देत संदीप घोरपडे यांनी सांगितले की दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन जोरदार सुरू असताना आम्ही काँग्रेस पक्ष संसदेत कायदेशीर लढत असताना आम्ही मात्र गावोगावी जाऊन शेतकरी पंचायतीच्या आयोजन करीत होतो व तेथे मोदी सरकारच्या कथित तीन काळ्या कायद्यांचा जनमानसात जाऊन यथा सांग माहिती देत होतो व आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणांचे विविध लाभ जनतेपर्यंत पोहोचवत होतो
त्या पुढील काळात देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली या 75 वर्षाच्या काळात आपल्या पक्षाने मोठ्या कष्टाने जडणघडण करीत हा देश उभा केला व त्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपा करीत आहे प्रचंड प्रमाणात पैसा व गैरमार्गाचा वापर करून लोकशाही खिळखिळी करण्याचा व संविधानाचे स्वरूप कमजोर करण्याचा प्रयत्न आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत जनतेला आम्ही अंतर्गत आवाहन केले की पैसे घेऊन मतदान करू नका दारू पिऊन मटण खाऊन मतदान करू नका गैर मार्गाला अफवांना बळी पडू नका अशा प्रकारे जनजागृती करीत आहे त्याची फलस्वरूप आम्ही अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजपाच्या वीस वर्षाच्या सत्तेला उलथवून टाकले
कुस्तीपटू महिला खेळाडू साक्षी मलिक व विनेश फोगाट यांच्यावरील अत्याचाराचे यथायोग्य वर्णन महिला मतदारांना सांगून त्यांचे मनोबल फक्त काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तरच स्थिर राहील हा विश्वास आम्ही निर्माण करीत आहोत
आता भविष्यात दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापनेला 138 वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने मी आपला पक्ष विचार ध्येयधोरणे माझ्या मतदारसंघातील 138 गावात जाऊन मतदारांपर्यंत पोहोचविणार आहे सोबत नव्याने पक्षात सामील झालेले कार्यकर्ते व जुने जाणते काँग्रेस प्रेमी लोकांना या चळवळीत सामील करणार आहोत
आपल्या पक्षाचे युवा नेते राहुलजी गांधी मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा आयोजित करीत आहेत ही यात्रा एकूण 67 दिवस लोकांसोबत चालणार आहे त्या यात्रेला सहकार्य म्हणून मी देखील 67 दिवस 67 समूहांना भेटी देऊन काँग्रेस पक्ष सोबत येण्याचे आवाहन करणार आहोत
असा एकंदरीत लेखाजोखा संदीप घोरपडे यांनी मांडला त्यावर नाना पटोले यांनी काम चालू ठेवा तुमच्या मागणीप्रमाणे मी पुन्हा जाहीर सभेसाठी अमळनेरला येणार तेव्हा तुझे काम अधिक जवळून पाहीन मग पुढील नियोजनाविषयी बोलूया असा आश्वासक शब्द दिला यावेळी तेथे प्रतिभाताई शिंदे ज्येष्ठ नेत्या जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील प्रदेश उपाध्यक्ष बंटी भैया पाटील यासह विनायक देशमुख व इतर अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते