जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवगांव देवळीच्या भूषण माळी ची भारतीय नौदलात निवड

जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवगांव देवळीच्या भूषण माळी ची भारतीय नौदलात निवड

अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मेहनत, जिद्द व अभ्यासातील सुसूत्रता राखत भूषणने हे यश गाठले. त्याच्या या यशामुळे देवगांव देवळी येथील सर्व मित्र परिवार यांनी सत्कार करत गावात मिरवणूक काढली व सत्कार करण्यात आला.. व देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला..
भूषणने आपले शिक्षण सुरू ठेवत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत होता.घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची फावल्या वेळेत भूषण शेतात वडीलांना कामात मदत करत असत…दहावी पर्यंत शिक्षण देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये घेतले. गावात संघर्ष अभ्यासिका वर्ग विद्यार्थ्यांनीं सुरु केल्यामुळे तरूण वर्ग स्पर्धा परीक्षा कडे वळला आहे. आजतागायत अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत.
देवगांव देवळी येथील शेतकरी श्री. रविंद्र साहेबराव माळी यांचे चिरंजीव भुषण रविंद्र माळी यांचे भारतीय नौदलात ( S.S.R) या पदासाठी सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन,एच ओ.माळी,शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजीराव पाटील यांनी भूषणचे ,वडील, आई यांचा सत्कार बुके व महात्मा फुले यांचे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.व भावीवाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page