अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर येथील वाणी समाज महिला मंडळाने लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात वसंत पंचमी निमित्त चैत्रगौरीचा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा केला.
जि.प.सदस्या जयश्री पाटील चैत्रगौरी पूजनाच्या मानकरी होत्या.
यानिमित्ताने तालुक्यातील हिंगोणे येथील सरपंच राजश्री राजेश पाटील यांना जिजाऊ कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व मंडळाच्या आजीव सदस्या डॉ. वैशाली नेरकर यांना लोकमत तर्फे गौरवीत करण्यात आल्याने या दोघींना सन्मानीत करण्यात आले.
कैरीची आंबवलेली डाळ,वेगवेगळ्या प्रकारचे लाडु, करंज्या,संजोऱ्या, चकल्या,अनारसे,डोकाळे, विविध घरगुती व पारंपारिक पदार्थांची कलात्मक मांडणी करण्यात आली होती .
मंडळ सातत्याने राबवीत असलेल्या पारंपारिक व संस्कृतीरक्षक उपक्रमांचे जयश्री पाटील यांनी कौतूक केले . राजश्री पाटील व डॉ. नेरकर यांनी मनोगतातून मंडळाचे आभार मानले. झिम्मा,फुगड्या,लगोरी आदी कालबाह्य होत चाललेल्या खेळांचा सर्वांनी आनंद घेतला . पारंपारिक प्रसाद वाटप झाले.
मंडळाच्या अध्यक्षा प्रा. रंजना देशमुख,उपाध्यक्षा अरुणा अलई ,कार्याध्यक्ष ज्योती मराठे ,सचिव वनश्री अमृतकर , खजिनदार हेमापूरकर, मनीषा शेंडे, वनिता महिंद, शुभांगी महिंद व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन वैशाली सोनजे व प्रेरणा अमृतकर यांनी केले.