मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेस १६ पासून प्रारंभ

*रयतसंदेश न्युज* :-

अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांमध्ये शेती निविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी ?यासाठी जनजागृतीपर रथयात्रेस १६ मे पासून प्रारंभ होत आहे.
सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मंगळ कृषी जनजागृती रथाचा शुभारंभ होणार आहे. या रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील १५४ गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत.

You cannot copy content of this page