अमळनेर येथे बी. बी. एफ. ची पहिली ऐतिहासिक परिचय बैठक उत्साहात संपन्न.

अमळनेर रयतसंदेश न्युज:-

धनदाई महाविद्यालयाच्या
यशवंत सभागृहात (अमळनेर) येथे गौतम मोरे यांच्या पुढाकाराने बी बी एफ ची प्रथम परिचय बैठक आणि अर्थनीती वर सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. या उद्योग व्यवसाय सेमिनार साठी 90% ओबीसी तरुणांनी सहभाग नोंदवून कार्यशाळा यशस्वी केली. प्रचलित व्यवस्थेत काय उणिवा असून आपली अर्थव्यवस्था आपण कशी उभी करावी याचे सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सतीश गौतम यांनी केले.देशात आणि परदेशात कोणकोणत्या उद्योगात संधी आहेत, त्या संधीसाठी कुठल्या अभ्यासक्रमास प्राधान्य द्यायला हवे, एकतरी परदेशी भाषा मुलांनी शिकली पाहिजे असेही ते म्हणाले.
बहुजनांना विविध उद्योग क्षेत्रात वाव मिळावा, ते उद्योग क्षेत्रात स्वतः जबाबदारी ने पुढे यावे या संकल्पनेने हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.मालेगाव येथील नंदू डावरे आणि नाशिकचे राम बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार सर होते.त्यांनी अमळनेर करांच्या वतीने व्यवसायात तरुणांच्या अडचणींवर आम्ही सहकार्य करू, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना वेळोवेळी सहकार्य करू असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.

कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करतांना कुठल्या साधनांचा आणि कश्याप्रकारे वापर करावा यावरही मान्यवरांनी आपले विचार मांडले.
कार्यशाळेस प्रा डॉ लीलाधर पाटील, बापूराव ठाकरे, डी ए पाटील, अशोक बिऱ्हाडे, भगवंत इंगळे, प्रा डॉ राहुल निकम.इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page