उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर येथे आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास श्री. प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा*

रयतसंदेश न्युज-

अमळनेर -गेल्या 15 जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी)यांचे जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. सदर मोर्चाकर्ते पदाधिकाऱ्याकडून श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांना लेखी स्वरूपाचे निवेदनात असे म्हटले गेले होते,की उपविभागीय प्रांत अधिकारी, अमळनेर यांच्याकडे वेळोवेळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात तपासण्या व सुनावण्या देखील झालेल्या आहेत. तरी देखील जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने सर्व आदिवासी कोळी समाजाने हा बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढला असून त्यास श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांनी लेखी स्वरूपाचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे याप्रसंगी मोर्चाचे सर्व पदाधिकारीसह मंचाचे अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव किरण पाटील सर, प्रवीण देशमुख सामाजिक कार्यकर्ता, हर्षल देशमुख, नरेंद्र पाटील रणाईचे अमित लालवानी ,अमळनेर आणि गुलाब आगळे या आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page