लोकशाही मार्गाने ठरणार व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्राचे शिलेदार ! 22 सप्टेंबरला होईल ऑनलाईन मतदान

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्ष यांची होणार निवड

अमळनेर ( प्रतिनिधी)- दि. १६ : देशभरासह जगातील ४३ देशांमध्ये संघटन असलेल्या सर्वात मोठ्या या संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने २२ सप्टेंबरला ठरणार आहे. ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील पत्रकारांना या निवडणुकीच्या माध्यमातून योग्य नेतृत्वाला पसंती देण्याची या निमित्ताने ऑनलाईन संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवडणूक कार्यक्रम २०२४-२५ साठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लोकशाही मार्गाने म्हणजेच निवडणुकीतून पूर्ण होणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष, ३ कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, ६ विभागीय अध्यक्ष इत्यादी पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
१३ ते १५ या दरम्यान संघटनेत दोन वर्ष चांगले काम करणाऱ्या आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या इचुक उमेदवारा कडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आलेल्या अर्जाची छाननी होईल. त्या अर्जातून १३ उमेदवार आपले नशीब आजमावतील. अनुक्रमे एक नंबरचे मतदान ज्या पदाधिकारी यांना होईल त्याला त्या प्रमाणे पद देण्यात येईल. दि.२१ सप्टेंबर,२०२४ पर्यंत प्रचारासाठी दहा दिवसांचा वेळ मिळेल.
दि.२२ सप्टेंबर,२०२४ ला मतदान होईल.
निवडणुकीचा निकाल दि.२३ सप्टेंबर,२०२४ रोजी जाहीर करण्यात येईल. सर्व पदाधिकाऱ्यांचा दि.२९ सप्टेंबर,२०२४ रोजी पदग्रहण व सत्कार संपन्न होईल.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.संजीवकुमार कलकोरी व सी. ए. सुरेश शेळके हे काम पाहतील. त्यांचा निर्णय अंतीम निर्णय असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page