राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशतकी जयंती महोत्सव आयोजन समितीचे गठन.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर (प्रतिनिधी ) – 31 मे 2025 राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मा.बन्सीलाल भागवत( राज्य उपाध्यक्ष- मौर्य क्रांती संघ,महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यात अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनावर 300 व्याख्यानांचे आयोजक प्रा.अशोक पवार सर ( अध्यक्ष – युवा कल्याण, प्रतिष्ठान) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख म्हणून शिवश्री.बापूराव ठाकरे ( अध्यक्ष – शिवरथ प्रतिष्ठान ) यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. अशोक पवार लिखित राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या पुस्तकावर आधारित परीक्षेचे प्रमुख म्हणून शिवश्री.अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. माहेश्वर दर्शन सहलीचे प्रमुख मा. दयाराम पाटील,एस.सी.तेले. यांची नियुक्ती करण्यात आली. *एक शाम अहिल्या माई के नाम* या सांस्कृतिक कार्यक्रमाचे समिती प्रमुख भाऊसाहेब देशमुख, अजय भामरे यांची निवड करण्यात आली.स्मरणिका प्रकाशन समितीचे प्रमुख म्हणून संजय सुर्यवंशी ( अध्यक्ष- यमुनाई प्रतिष्ठान) यांची निवड करण्यात आली.अशा विविध कार्यक्रमांमध्ये अहिल्यामाई यांच्या 300 प्रतिमांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व समाजातील जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांना अहिल्यामाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि सर्व समाजातील कर्तृत्ववान पुरुषांना मल्हारराव होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राजमाता अहिल्यामाई होळकरांच्या वारसदारांना( माहेर चे चौराखडी,जि.धाराशिव) आणि मल्हारराव राजे होळकर यांच्या वारसदारांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते अहिल्यामाईंच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी लोककला ,शोभायात्रा ,आदिवासी नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांत अहिल्यामाईंचे ऐतिहासिक तैल चित्रांचे प्रदर्शन आणि नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. अशा विविध माहितीयुक्त , वाचनीय कार्यक्रमांचे आयोजन वरील समितीच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. या बैठकीच्या वेळी बन्सीलाल भागवत, प्रा.अशोक पवार,भाऊसाहेब देशमुख, अशोक बिऱ्हाडे साहेब, अशोक इसे , एस.सी. तेले, अशोक पाटील, भानुदास सैंदाणे, संजय सूर्यवंशी दयाराम पाटील, बापूराव ठाकरे, अजय भामरे ,मनोज मोरे उपस्थित होते. तरी सर्व सामाजिक,पुरोगामी, संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव यांनी वरील कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घ्यावा . तसेच वरील समित्यांमध्ये प्रसंगावधान साधून विस्तार करण्यात येणार आहे. सदर समित्यांमध्ये भाग घेऊ ईच्छिणाऱ्यांनी समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा, पुढील मिटिंग ही व्यापक स्वरूपात घेण्यात येणार आहे. असे आवाहन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page