*कर्तृत्वाचा महासन्मान*

अमळनेर प्रतिनिधी :– तरुण पिढीने केवळ स्पर्धा परीक्षा यांचा अभ्यास न करता इतरही अभ्यासक्रमामध्ये आवड ठेवावी प्लॅन बी तयार ठेवावा अश्या मार्गदर्शक सूचना आयुक्त संदीप कुमार साळुंखे (नागपूर) यांनी केल्या ते उत्कर्ष खान्देशी अधिकारी व तालुक्यातील विविध विकास मंचातर्फे झालेल्या *कर्तुत्वाचा महान सन्मान*या कार्यक्रमात बोलत होते. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज .नाट्यगृहात मुंबई सिडकोची व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या विशेष उपस्थिती व नाशिक जी.एस.टी विभागाच्या उपायुक्त मधुकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, खा.शी. मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंग अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय भदाणे खा.शी .मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.एस आर चौधरी, निवृत्त उपप्राचार्य डॉ.एस.ओ. माळीसर,प्रा.अशोक पवार सर, डॉ.अविनाश जोशी,आधी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले डॉ.घनश्याम पाटील, (फ्लाईंग ऑफिसर) ऋतुजा पाटील (मुख्याधिकारी )प्रसाद चौधरी (सहाय्यक आयुक्त राज्यकर ) रोहित पवार (सहाय्यक अभियंता वर्ग -2) राहुल पारधी, नेहा पाटील, विवेक सोनवणे (विक्रीकर निरीक्षक) सागर पाटील, (पशुधन विकास अधिकारी) रामदास चव्हाण ,(विकास अधिकारी) हर्षदा देसले, (कृषीच्या डेप्युटी डायरेक्टर) माधुरी पाटील, (पी.एस.आय.) जयवंतराव येशीराव,( पी.एस.आय.) घनश्याम काटे (पोलीस) यांच्या सर्व विविध पदांवर नियुक्ती झालेले खानदेशातील सुमारे ७५ कर्तृत्ववान तरुणांचा यावेळी सन्मान आणि कौतुक करण्यात आले .उत्कर्ष खान्देशी अधिकारी ग्रुपचे समन्वयक तथा नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार यांनी प्रास्तावित केले. युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, उमेश काटे सर यांनी सूत्रसंचालन केले. डी.ए .धनगर सर यांनी आभार मानले .तालुक्यातील विविध विकास मंच, शिवशाही फाउंडेशन, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अंबरीशऋषी टेकडी ग्रूप ,साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र ,पी.टी.ए. कोचिंग क्लासेस ,माजी प्रतापीयन्स प्रबोधिनी सीसीएमसी प्रताप कॉलेज, प्रताप तत्वज्ञान केंद्र यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले .

You cannot copy content of this page