पंतप्रधान पिक विमा योजना (खरीब) 2023-24
अमळनेर ता.प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
तर्फे पी.एम.एफ.बी.वाय. प्रचार वाहनाचे उद्घाटन मा.जिल्हा परिषद सदस्या ताईसो.सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी ठाकरे साहेब, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक तालुका युवकाध्यक्ष विनोद जाधव, रामेश्वरचे बाळू पाटील, तालुका युवक उपाध्यक्ष मुन्ना पवार, मनोज बोरसे आदी शेतकरी बांधव कार्यकर्ते पदाधिकारी व पिक विमा तालुका प्रतीनिधी किरण पाटील उपस्थित होते.
तरी या योजनेची अंतिम तारीख 31/07/2023 आहे .सर्व शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे ही असे आवाहन करण्यात आले आहे.