*अमळनेर येथील क्रीडा संकुलांचा कायापालट*
अमळनेर प्रतिनिधी:- बापूराव ठाकरे.
अनेक वर्षापासून रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या कामांना गती देण्यासाठी कार्यतत्तर आमदार साहेब माननीय नामदार अनिल भाईदास पाटील यांनी तालुक्यातील उज्वल भविष्यासाठी दोन कोटी निधी प्राप्त करून दिला आहे. माननीय नामदार अनिल पाटील यांनी क्रीडा संकुल साठी दहा कोटीची मागणी केली होती .परंतु सध्या क्रीडा संकुल साठी दोन कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी कागदपत्रांचा पाठपुरावा करून तालुका क्रीडा संकुलाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभाग कडून क्रीडा विभागाकडे घेतला आहे. दोन कोटी रुपयांत इनडोअर हॉलचे अपूर्ण काम पूर्ण केले जाईल. बॅडमिंटन हॉल दुरुस्ती ,फ्लोरिंग, विद्युतीकरण, टेटाफ्लेक्स, बास्केटबॉल काँक्रीट मैदान ,मुलांसाठी स्केटिंग रिंग, रनिंग ट्रॅक नूतनीकरण ,जेष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, रस्त्याला लावून हॉलीबॉल चे दोन मैदाने.पाणी पुरवठा सोय.सँनिटायझर सुविधा करण्यात येणार आहेत .पोलीस व आर्मी भरती साठी मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी, खेळाडूंसाठी सुसज्ज अश्या सुविधा उपलब्ध होणार आहेत असे मा.नामदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले त्यामुळे तरुण आणि जेष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे