*इमारतीवरून पडून मयत झालेल्या शाहिदच्या कुटुंबियांना ५१ हजारांची मदत*मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न — मंत्रीअनिलदादा पाटील.
इमारतीच्या तिसरा मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने मिलचाळ भागातील शेख शाहिद शेख सादिक या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच आर के नगर परिसरात घडली होती.शाहिदच्या पीडित कुटुंबियांचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांत्वन करून 51 हजारांची मदत रोख स्वरूपात दिली आहे.
शाहिदचे कुटुंबीय त्याच्या साठी मुलगी पाहण्यासाठी गेले होते, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला या घटनेने शेख कुटुंबातील होतकरू आणि कमावता मुलगा जाऊन कुटुंबावर मोठा आघात झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.”तसेच तूर्तास काहीतरी आधार म्हणून मयत तरुणाच्या कौटुंबिक सदस्यांकडे मंत्री अनिल पाटील 51 हजारांची मदत सुपूर्द केली.यावेळी माजी नगरसेवक मनोज पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,इम्रान खाटीक, विनोद कदम,जितेंद्र हगविणे,विक्की पानसे,अलीम मुजावर,आबीद शेख समस्त मुस्लिम बांधव तसेच छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे सदस्य उपस्थित होते. सदर योगदानाबद्दल मिलचाळ भागातील छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेतर्फे मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर(प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या महासंसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे या अमळनेर विधानसभा मतदार…