रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात 2023 या शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यासमवेत व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत बैठक झाली होती. त्यामध्ये काही प्रश्न सुटलेले आहेत व काही प्रलंबित देखील आहेत, तसेच नवीनही काही प्रश्न/समस्या निर्माण झाल्या असतील.
जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार सत्यजीत तांबे लवकरच आढावा बैठक घेणार असून त्यासाठी मागील प्रलंबित काही प्रश्न असतील किंवा नवीन निर्माण झालेले प्रश्न असतील तसेच कुणाचे वैयक्तिक प्रश्न असतील तर ते दोन दिवसाच्या आत लेखी स्वरूपात कळवावे जेणेकरून आढावा बैठकीपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीची प्रश्नावली पाठविणे सोपे होईल.
संपर्क :- महेश दिघे, OSD.
मोबाईल: 9130098781
E-Mail ID: office@satyajeettambe.com