राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.*

रयतसंदेश न्युज नेटवर्क:-

अमळनेर (प्रतिनिधी) :- ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केलख जातो. या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी (शरदचंद्र पवार) तर्फे जळगाव जिल्ह्यातील 40 शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री.दिलीपराव सोनवणे, विशेष अतिथी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, शहर अध्यक्ष  एजाज भाई मलिक, वाल्मीक पाटील, दयाराम पाटील, जिल्हा परिषद शा.पो. हा. अधीक्षक विजय पवार,शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, महीला शहर अध्यक्षा मंगलाताई पाटील, मा.श्री.गोपाळ दर्जी, वाय एस महाजन,मोहन पाटील उपस्थित होते गुलाबराव देवकर यांनी मनोगत व्यक्त करताना आधुनिक युगात शिक्षकांनाही स्वत:ला अद्ययावत करावे लागेल जेणेकरुन ते आपल्या विद्यार्थ्यांना चांगले भविष्य देऊ शकतील आणि समाजाला एक चांगला नागरिक देऊ शकतील असे सांगितले यावेळी मा आमदार दिलीपराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, शहर अध्यक्ष एजाज मलिक, मिलिंद बागुल सर ,अल्ताफ अली तुळशीराम सोनवणे ,गोपाल दर्जी,विजय पवार साहेब,खलील शेखसाहेब, यांनी देखील आपले विचार व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या , सेवानिवृत्त पाच व्यक्तींना  प्रा.मा. श्री.पी.डी.जगताप सर, पंडित श्रीपत सोनवणे सर, अब्दुल मजीद सेठ झकेरिया मेमन, नारायण कोंडजी पवार, आणि इक्बाल बेग उस्मान बेग मिर्झा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तसेच डॉ मिलिंद विनायक बागूल, तनवीर जहाँ शेख इक्बाल, सुनीता अस्मान बनसोडे , शाम दिगंबर ठाकरे, संगीता मनोहर गोहील , पंकज प्रभाकर जोगी आणि डॉ शेख बाबू शेख सायबू यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरवण्यात आले तसेच डॉ. राजेंद्र पटील, भैय्या साहेब देवरे, शेख नूर मोहंमद, नंद किशोर देवरे, अजीज अब्दुल गनी रंगरेज, शेख जावेद अस्लम, तुळशीराम सोनवणे, सय्यद अल्ताफ अली हसन अली , किशोर सोनवणे, मिलिंद नाईक, गुणवंत मोरे, शेख मो रफिक मो ताहीर, सुदर्शन दिनकर, मुजावर शाकीर अहमद, सुनील दाभाडे, सय्यद मोहम्मद इद्रिस सर, महेंद्र साळुंखे, रंजना चंद्रकांत चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच  दिपक आर्डे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच विशेष पुरस्कार संजय वामनराव पाटील व  सन्मुख गणेश महाजन यांना प्रदान करण्यात आले तसेच आदर्श शिक्षकेतर कर्मचाऱी म्हणून शाह आसिफ अब्दुल अजीज, जुबेर खान रसूल खान पठाण आणि भूषण गणेश अमृतकर यांना यांना देण्यात आला कार्यक्रमाला तेजस युवराज रडे (प्रभात गृप) व कादर कच्छी सर (चेअरमन एच.एम.टी.स्कूल,जळगाव ) यांनी विशेष सहाय्य केले. पुरस्कारा सोबत श्री.प्रवीण धनगर उपशिक्षक प.न.लुंकड कन्याशाळा, जळगाव यांनी सर्व पुरस्कारार्थी यांना त्यांनी लिहलेले एकत्रीत व्याकरण पुस्तक शाळेतील ग्रंथालयाला भेट म्हणून दिले. प्रस्तावना मनोज भालेराव यांनी तर आभार मुश्ताक भिस्ती यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक (शरदचंद्र पवार) महानगर आघाडीचे महानगर अध्यक्ष मनोज भालेराव, सचिव प्रवीण धनगर, उपाध्यक्ष मुश्ताक भिस्ती, सर कार्याध्यक्ष पंकज सूर्यवंशी, सरचिटणीस जिया बागवान,हेमंत सोनार,विजय विसपूते, दिपक आर्डे आणि फरहान अहमद यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page