अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
ग्राम विकास मंडळ संचलित, क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल *प्रा. सुजाता निकम* यांनी ग्रंथालय शास्त्र व माहितीशास्त्र या विषयात पीएचडी पदवी मिळाली.
प्रा सुजाता निकम यांनी जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयीन वाचनकर्त्याच्या सवयी मधील ग्रंथालयाचा सहभाग या विषयावर अलिगड विद्यापीठातील डॉ अमजद अली व कुसुंबा धुळे येथील डॉ अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सतत सहा वर्ष अथक परिश्रम घेऊन संशोधन कार्य पूर्ण केल्याने राजस्थान मधील जेजेटी विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी प्रदान केली.
त्यांचे अभिनंदन ग्राम विकास मंडळ चे अध्यक्ष मा.खा.नानासाहेब विजय नवल पाटील,कॉलेज चे प्राचार्य डॉ विजय उबाळे व प्राध्यापक वृंद सह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.त्यांच्या यशा बद्दल विविध स्तरावरून कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.त्या लोकप्रिय दैनिक देशोन्नती प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे खानदेश विभाग उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे यांच्यां अर्धांगीणी आहे.