आज रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपड़ा सचलित श्रीमती शरचन्द्रिका सुरेश पाटील तंन्त्रनिकेतन विभागा मार्फत *एक पेड़ माँ के नाम* या अभियाना अंत्तर्गत आपल्या मंगरुळ.ता.चोपडा गावातील स्मशान भूमीवर विद्यार्थ्यांच्या मदतीने 101 झाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उदघाटन आप्पासो श्री. प्रेमलाल छन्नू पाटील व नानासाहेब श्री अतुल भीमराव ठाकरे(मा.चेअरमन. चो.सा.का.) यांनी श्रीफळ फोडून केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालया मार्फत श्री शशिकांत शिवाजी पाटील , श्री धनराज पाटील सर व श्री भूषण पवार सर होते.गावातील सर्व सेवाभावी बांधवांनी सहभाग घेतला. चोपडा येथील संस्थे मार्फत झाडांची उपलब्धता करण्यात आली होती.
रयतसंदेश न्युज अमळनेर :– प्र.डांगरी ता.अमळनेर येथील सन १९८४ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेह मेळावा तब्बल चाळीस वर्षानंतर…