अमळनेर (प्रतिनिधी ) – येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभाचे आयोजन २८ जुलै २०२४ रविवार रोजी सकाळी ८.३० वाजता स्टेट बँक मागे, इंदिरा भवन अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दि.अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचेवतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने इ १० वी व १२ वी यात ८०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात येणार आहे. याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे मार्कशीट ची झेरॉक्स कॉपी बँकेच्या वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांचेशी संपर्क साधून जमा करावेत. तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे , व्हाईस चेअरमन रणजित शिंदे,संचालक मंडळ यांनी केले आहे.
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर(प्रतिनिधी)- साळवे ता.धरणगाव शाळेच्या विकास करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते त्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानासह अद्यावत…
रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर (प्रतिनिधी) साळवे इंग्रजी विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रभाषा हिंदी चे महत्व या विषयावर प्रबोधनात्मक भाषणे…