रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर ( प्रतिनिधी)- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित,श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने “एक पेड माँ के नाम” अभियान राबविण्यास सुरुवात केली असून.आज दिनांक २०.जुलै.२०२४ रोजी प्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अँड भैय्यासाहेब श्री संदीप सुरेश पाटील व मंडळाच्या सचिव मा.ताईसाहेब डॉ स्मिता संदीप पाटील व सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल मा. श्री योगेश पुंडलिक सातपुते व वनपाल श्री आर डी भांमरे उपस्थित होते.
यावेळी तंत्रनिकेतन विभागाचे प्राचार्य मा.श्री व्हीं एन बोरसे व तंत्रनिकेतन समन्वयक श्री ए.एन.बोरसे सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मिळून वृक्षारोपणाच्या अभियानाला सुरुवात केली या अभियानात महाविद्यालयीन परिसर व चोपडा शहरातील विविध वसाहतीत जवळपास दहा हजार झाडे लावण्याचा मानस आहे
प्रसंगी पर्यावरण प्रतिज्ञा म्हणून चांगले पर्यावरण हेच चांगले मानवी जीवन असा संदेश देण्यात आला.